सोलापूर, दि.13:
सोलापूर जिल्ह्यासाठी मोठी आनंदाची बातमी अशी की आज बुधवारी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात कोरोनाची लस दाखल झाली आहे.आता काही वेळापूर्वी आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी ही माहिती दिली.
सोलापूर जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 30 हजार 184 आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लस दिली जाईल. लसीकरण मोहिमेसाठी सर्व प्राथमिक तयारी झाली असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
जिल्ह्यातील 16 केंद्रावर लसीकरण केले जाणार आहे. त्यापैकी ग्रामीण भागात बारा तर सोलापूर शहरात चार ठिकाणी लसीकरण केंद्र असणार आहेत. प्रत्येक तालुक्यात एक तर माळशिरस तालुक्यात दोन केंद्रे असणार आहेत. लसीकरणाची प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. लसीकरणासाठी 599 लसटोचक नियुक्त करण्यात आले असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर पाच जणांचे पथक असणार आहे. तसेच एक निरीक्षक आणि एक ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोईंग इम्युनायझेशन मॅनेजमेंट ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविड शिल्ड लस मिळणार आहे. आज संध्याकाळपर्यंत लस सोलापुरात पोहोचेल. सोलापुरसाठी 34 हजार डोसेस उपलब्ध होणार आहेत. या लस जिल्हा लस भांडार येथे साठवण्यात येणार आहेत. त्यासाठी शासकीय रुग्णालय परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे.
34000 कोविशिल्ड लसीचे डोस सोलापूर जिल्ह्यास प्राप्त…
COVID 19 संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पहिल्या टप्पा 16 जानेवारी 2021 शनिवार या दिवशी होणार असून त्यासाठी 13 लसीकरण ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत.यासाठी 34000 डोस लस आलेली असून सदर लस सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीची आहे. लस 2 ते 8 डिग्री centigrade तापमान मध्ये ठेवावी लागते व याची पूर्वतयारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केलेली आहे.
अशी आहे जय्यत तयारी…
शित साखळी अबाधित ठेवून लस लाभार्थी पर्यंत पोहोच करण्याचेही नियोजन झालेले असून सर्व ठिकाणी कर्मचारी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
दिनांक 16 जानेवारी रोजी जिल्ह्यातील शासकीय संस्थात याचा शुभारंभ होणार असून त्यानंतर विविध शासकीय व खाजगी संस्थांमध्ये लसीकरण सुरू राहणार आहे.
Leave a Reply