27 डिसेंबर रोजी जुळणार वधू-वरांच्या रेशीम गाठी
सोलापूर (प्रतिनिधी)
लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळा कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करून 27 डिसेंबर रोजी गोरज मुहूर्तावर हरिभाई देवकरण ऐवजी जुळे सोलापुरातील कै.विलासचंद्र मोतीचंद्र मेहता माध्यमिक शाळेच्या मैदानावर होणार असल्याचे लोकमंगल फाऊंडेशनडेशनतर्फे सांगण्यात आले. सोहळ्याची सारी यंत्रणा सज्ज झाली आहे.
यंदा कोरानाची परिस्थिती आहे. यंदाच्या सोहळ्यात आतपर्यंत 40 वधू- वराची नोंदणी झाली आहे. यंदा शाही भोजन आणि मिरवणूक टाळण्यात येणार आहे. सोहळ्यास शासनाची मर्यादा 50 लोकांची असली तर दोन्ही वधू-वरांच्या मोजक्याच म्हणजे 25 ते 30 माणसांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे हरिभाई देवकरण ऐवजी कै.विलासचंद्र मोतीचंद्र मेहता माध्यमिक शाळेच्या मैदानावर विवाह सोहळा होणार आहे.
लोकमंगलच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे 14 वे वर्ष असून आजवर 2 हजार 889 जोडप्यांचे विवाह लावण्यात आले आहेत. सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करणार्या जोडप्यांना शासनाचे अनुदान मिळणार आहे. यासाठी लोकमंगल फौंडेशन मदत करणार आहे. या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधू- वरास विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे, वर्हाडी मंडळीच्या भोजनाची सोय, मामाकरिता मानाचा आहेर, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था, वधूस मणी मंगळसूत्र व जोडवे यासह संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 0217- 2322480, मो. 9657709710 येथे संपर्क साधावा, असे आवाहन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
Leave a Reply