Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

सोलापूर : बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस शिपाई रामेश्वर मोहिते यांचे शनिवारी विजेच्या धक्क्याने दुर्दैवी निधन झाले. विजेच्या धक्यापेक्षाही मोठा धक्का देणारी बाब म्हणजे त्याचे पाच महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलीस शिपाई रामेश्वर मोहिते हे चिखली (ता.जि उस्माबाद ) येथील रहिवाशी होते. सध्या ते बार्शी तालुका पोलिस ठाणे येथे कार्यरत होते. त्यांच्या गावाकडील शेतात ही दुर्घटना घडली.

रामेश्वर मोहिते त्यांच्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावाने प्रचलित होते. रामेश्वर मोहिते यांच्या जाण्याने संपूर्ण चिखली गावावर शोककळा पसरली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *