स्वरा संकल्प फाउंडेशन च्या वतीने आधार केअर सेंटर येथे वृद्ध रुग्णांना धान्य व शहाळ वाटप
वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून वृद्ध रुग्ण रुग्णांचे काळजी घेणाऱ्या आधार केअर सेंटर भोगाव येथील रुग्णांना पौष्टिक आहारासाठी लागणारे धान्य व शहाळ वाटप करण्यात आले.
यावेळी आधार केअर सेंटरचे संस्थापक डॉ नंदा शिवगुंडे ,स्वरा संकल्प फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष राहुल निमाले, उपाध्यक्ष सोमनाथ कोणदे, सहसचिव विकास हिरेमठ ,इतर पदाधिकारी, संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते
वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकदा अनावश्यक खर्च करावा लागतो. या खर्चाला फाटा देऊन सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे. समाजातील अनेक घटकांसाठी मदतीसाठी हात पुढे येत आहेत, हा एक शुभ संकेत आहे, अशी प्रतिक्रिया आधार केअर सेंटरच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
Leave a Reply