Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

वैराग : येथील वैराग ते सोलापूर रोडवर वैराग पासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील बंडेवार विहीर जवळ एसटीचा ब्रेक फेल झाल्याने टेम्पो, एसटी बस व क्रेन यांचा तिहेरी अपघात होऊन टेम्पो, क्रेन बस ड्रायव्हरसह बसमधील ५ जण गंभीर तर १० किरकोळ जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

हा अपघात रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला. असून सर्व जखमींना सोलापूर, बार्शी व वैराग येथील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. जखमी टमटम ड्रायव्हर गोविंद श्रीकांत वाघमारे रा. वैराग ( वय ३५ ) बार्शी येथे व बस चालक विजय संगमा स्वामी रा. वडाळा ( ता. उत्तर सोलापूर ) ( वय ४६ ) वैराग येथे उपचार घेत आहेत. तर क्रेनचालक, बसचे प्रवासी बार्शी, सोलापूर येथे उपचार घेत आहेत.

अपघाताची समजलेली माहिती अशी की, बार्शी आगाराची बार्शी- सोलापूर या विना वाहक, विना थांबा एस.टी.( बस क्रमांक एम.एच. ०७ सी ७३३४ ) बसचा वैरागपासून दोन किलोमिटर अंतरावर बंडेवार विहिरी जवळ आल्यावर ब्रेक फेल झाल्याने पुढे चालत असलेल्या छोटा हत्ती या टमटमला ( क्र. एम.एच. १३ ए.एन.२५९२ ) ला ओव्हरटेक करताना समोरून वाहन आले असता ब्रेक मारला, पण तो न लागल्याने पुढील टमटमवर बस जावून जोरात धडकली व अपघातग्रस्त टमटम त्याच्या पुढे चालणाऱ्या क्रेनवर
( क्र.एम.एच. ४६ बी.२९१ ) वर जावून धडकले.

यामध्ये टमटम चालक व बसचालक, क्रेनचालक जखमी झाले. तर एस. टी.बस नियंत्रणात आणण्यासाठी बस चालकाने रस्त्याच्या कडेच्या झाडाझुडपात बस घालुन बाभळीच्या झाडावर आदळली. यामध्ये बस चालकासह बसमधील दहापेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले असल्याचे प्रथम दर्शनी लोकांतून सांगितले जाते. सध्या बार्शी – सोलापूर नवीन महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे शेळगाव ते वैराग रस्ता सध्या खोदाई, मुरूम टाकून भरणे, साईडपट्टीची रुंदी वाढविणे तसेच रोडच्या दुतर्फा कडेची झाडे तोडणे अशी कामे चालू आहेत.

या अपघातामुळे सुमारे एक तास या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलीस पाटील सुधाकर देवकते , अमर करंडे आदींनी टेम्पोत अडकलेल्या ड्रायव्हरला बाहेर काढून मदत केली.घटनास्थळी वैराग पोलीस स्टेशनची टीम पोहचली असता वाहतूक व्यवस्था सुरुळीत केली. रात्री उशिरापर्यंत वैराग पोलिस स्थानकात अपघाताचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

विना वाहक विना थांबा या एस टी बस मधून बार्शी सोलापूरला पंचवीस प्रवासी घेऊन जात असताना अपघातस्थळी टमटमला ओव्हरटेक करताना समोरून वाहन आले. म्हणून ब्रेक मारला पण तो निकामी झाल्यामुळे समोरील वाहनाला धडक बसली. याच वेळी प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी एस टी बस रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडा झुडपात घालुन बाभळीच्या झाडावर आदळल्याचे बस चालक संगप्पा स्वामी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *