शहरात तपासणीचा उच्चांक ;आज 2823 निगेटिव्ह तर 116 पॉझिटिव्ह ; एकही मृत्यू नाही

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शनिवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 12 पर्यंत तब्बल 2939 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 2823 अहवाल निगेटिव्ह आले असून 116 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 82 पुरुष तर 34 महिलांचा समावेश असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज 79 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.

ज्या वेगाने सोलापूर शहर आणि परिसर बाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. त्याच प्रमाणे मृत्यूचे कमी होताना दिसत आहे.आज मात्र नवीन 116 रुग्ण आढळले आहेत .मोठ्या प्रमाणावर
शहर परिसरात कोरोना टेस्ट करण्याचे प्रभाग निहाय नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार टेस्टिंग होत आहे परंतु, अजूनही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि तपासणी प्रमाण वाढवणे गरजेचे आहे.जेणेकरून, कोरोनाची साखळी तोडण्यात सोलापूरकर यशस्वी होतील.

आज एकही कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज पर्यंत एकूण 387 जणांचा बळी या आजाराने गेला आहे. यामध्ये 258 पुरुष तर 129 महिलांचा समावेश होतो.

आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 5805 इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 387 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 939 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 4479 इतकी लक्षणीय आहे.