शहरी | आज पर्यंत बरे झालेल्यांची संख्या 8830; तर नवे कोरोनाबाधित 13

सोलापूर शहरात आज सोमवारी दि.9 नोव्हेंबर रोजी कोरोनाचे नवे 13 रुग्ण आढळले असून यामध्ये 6 पुरुष तर 7 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 22 इतकी आहे.

आज सोमवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 392 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 379 निगेटीव्ह आहेत.

आज एकही जणांचा कोरोनाने मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9808 असून एकूण मृतांची संख्या 543 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 435 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 8830 इतकी आहे.