श्रीराम जन्मोत्सव समिती विविध सामाजिक उपक्रम गेल्या वर्षभरात राबवत आहे.
कोरोना च्या संकटकाळात ही समितीने मदत कार्य,धान्य वाटप, सॅनिटायझर व मास्क आधी वाटप केले आहे .
कोरोना काळात सिव्हिल हाच कोरोना पेशन्ट साठी एकमेव पर्याय होता. त्यामध्ये सिव्हिल मध्ये ही काही कर्मचारी स्वतः जीवतोडुन काम करत होता त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून श्रीराम जन्मोत्सव समितीने सिव्हील हॉस्पिटल मधील कर्मचार्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले.
यामध्ये संध्या गावडे,आशा मानेपाटील,सागर उंडाळे, शैलेश किर्तीवार, शशिकांत साळवी, राम फलफले,गणेश गायकवाड,आशा वाघमोडे,डॉ.प्रज्ञेश पंचवाडकर,विजय कोरके,मकरंद देवधर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी समितीचे संजय साळुंखे,संजय होमकर,जयसिद्धेशर नाडार,सागर आतनुरे,यतीराज होनमाने,गुरुराज पदमगोंडा,समर्थ बंडे जगदीश होणराव,महेश उलगडे,महेश जेऊर,शिलवंत चपेकर,महेश खसगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply