सोलापूर- पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या धर्तीवर सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले व्हावे यासाठी वंचित बहुजन आघाडीने सोमवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक तथा शहराध्यक्ष गणेश पुजारी यांनी सांगितले.
गेल्या पाच महिन्यांपासून सिद्धेश्वर मंदिर कुलूपबंद आहे दर्शनापासून भाविक वंचित आहे कोरोनामुळे नगरवासीय भयभीत आहे ही भीती भय अन कोरोनाची चिंता दूर व्हावी हि वंचित बहुजन आघाडीची अपेक्षा आहे मंदिरात गेल्याने अथवा तिथे डोळे मिटून ध्यान केल्याने मनातील भीती भय दूर होण्यास मदत होते.नियम,अटी घालून दिल्यास मंदिर खुले करण्यास काहीच हरकत नाही.
सोमवारच्या आंदोलनात विविध जाती धर्माच्या घटकांमधील भक्तगणांनी सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष नगरसेवक गणेश पुजारी यांनी केले आहे.