सोलापूर,दि.3: सोलापूर शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग पाहता 31 ऑगस्ट 2020 पर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या काळात सोलापूर ग्रामीण भागातील शहराला जोडून 9 तर आंतरजिल्हा व आंतरराज्य सरहद्दी वरील 178 गावातील रस्ते वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.
ग्रामीण भागात संचारबंदी परिणामकारक होण्यासाठी, सोलापूर शहरातील लोक ग्रामणी भागात जावून कोरोना संसर्ग वाढवू नयेत, बाहेरून लोकांचे आगमन आणि निर्गमन होऊ नये, यासाठी गावाला जोडणारे रस्ते बंद करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा, शासनाने परवानगी दिलेल्या सर्व सेवासुविधा पुरवविणाऱ्या आस्थापनांचे वाहतुकीच्या वाहनांकरीता पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी सुरु राहतील असे, श्री. पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.
शहरानजीकचे बंद करण्यात आलेले रस्ते आणि पर्यायी रस्ते खालीलप्रमाणे.
अ.क्र. | विभाग | बंद करण्यात येणारे रस्ते | पर्यायी रस्ते |
1. |
सोलापूर |
हिरज ते विद्यापीठजवळ पुणे हायवे रोडला मिळणारा रस्ता | तिऱ्हे ते सोलापूर |
2. | तिऱ्हे ते शिवणी | शिवणी ते हिरज | |
3. | केगांव ते खेड अंतर्गत रस्ता | खेड ते बाळे | |
4. | हगलुर ते दहिटणे | हगलूर ते तुळजापूर रोड | |
5. | पाथरी ते बेलाटी रस्ता | पाथरी ते तिऱ्हे | |
6. | सोरेगांव ते डोणगांव ते नंदूर | नंदुर ते सोरेगांव | |
7. | सारेगांव ते समशापूर | समशापूर ते हत्तूर | |
8. | सोरेगांव ते डोणगांव ते तेलगांव | तेलगांव ते पाथरी | |
9. | अक्कलकोट | विडी घरकुल कुंभारी ते विजयनगर मार्गे सोलापूर | क्रांती चौक ते मेनरोड (सोलापूर अक्कलकोट) |
अक्कलकोट विभागातील आंतरजिल्हा व आंतरराज्य सिमा बंद राहतील. ग्रामीण भागात सोलापूर,बार्शी, करमाळा उपविभाग (माढा तालुका), करमाळा तालुका, अकलूज, मंगळवेढा विभाग (सांगोला तालुका), मंगळवेढा तालुका या भागातील राज्यसरहद्दीवरील 209 रस्त्यापैकी 178 रस्ते बंद राहतील. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा यांच्यासाठी 31 पर्यायी रस्ते चालू राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.