बेरोजगारीवर प्रभावी उपाय योजना करा.- अँड एम.एच.शेख
सोलापूर दिनांक – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन च्या काळात संबंध देशात भूकबळी आणि न भूतो न भविष्यती अशी बेकारीची परिस्थिती उद्भवली.उद्योगधंदे बंद पडले,लोकांची क्रयशक्ती घटली, असे भीषण दारिद्रय असताना केंद्र आणि राज्य सरकार यावर प्रभावी उपायांची अंमलबजावणी करण्याकरीता सर्वांना मोफत रास्त धान्य द्या, लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करा, बेरोजगारांना रोजगार द्या, कामगार कायद्यातील प्रतिगामी बदल रद्द करा,शेतकऱ्यांच्या विरोधातील विधेयक मागे घ्या या प्रमुख न्याय हक्काच्या मागण्या घेऊन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मागणी सप्ताहाची हाक देण्यात आली. अशी माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अँड एम.एच.शेख यांनी घरोघरी लक्षवेधी आंदोलन करताना दिली.
मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या वतीने कामगार कष्टकरी,कर्मचारी यांच्या रोजगाराचे प्रश्न घेऊन देशव्यापी मागणी सप्ताह पाळण्याची हाक देण्यात आली त्या अनुषंगाने सोलापूरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय समिती सदस्य राज्य सचिव माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सचिव अँड एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली शहरात आणि ग्रामीण भागात ठिकठिकाणी मागण्यांचे फलक दाखवून घरोघरी लक्षवेधी आंदोलन मागणी सप्ताह पाळण्यात आले.
दत्त नगर येथे माजी नगरसेविका कॉ.सुनंदा बल्ला, अशोक बल्ला,दीपक निकंबे,अनिल वासम शिवा श्रीराम, किशोर गुंडला सुरज सोनसळे आदींनी फलक दाखवून सरकारचे लक्ष वेधले.