Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

 

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज रविवारी दि.4 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 251 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 163 पुरुष तर 88 महिलांचा समावेश होतो.

आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 222 आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 2208 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1957 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 26 हजार 300 इतकी झाली आहे. यामध्ये 16,232 पुरुष तर 10,068 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.


आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 715 जणांचा मृत्यू झाला आहे यात 506 पुरुष तर 209 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 5 हजार 214 आहे .यामध्ये 3 हजार 660 पुरुष तर 1554 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 20 हजार 371 यामध्ये 12,064 पुरुष तर 8307 महिलांचा समावेश होतो.
अक्कलकोट -नागरी 1 तर ग्रामीण 0
बार्शी –नागरी 20 तर ग्रामीण 23
करमाळा –नागरी 0 ग्रामीण 6
माढा – नागरी 8 तर ग्रामीण 37
माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 37
मंगळवेढा – नागरी 7 ,ग्रामीण 2
मोहोळ – नागरी 5 ग्रामीण 12
उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 2
पंढरपूर – नागरी 23 ग्रामीण 41
सांगोला – नागरी 11 ग्रामीण 13
दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 3
आजच्या नोंदी नुसार नागरी -75 तर ग्रामीण भागात 176 असे एकूण 251 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *