सोलापूर ,प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज शनिवारी नवे कोरोनाबाधित 38 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून एकाच दिवशी 35 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 38 पैकी 31 पुरुष, 7 स्त्रियांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 1180 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 40 हजार 459 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 442 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1507 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1469 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 38 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 1180 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 38 हजार 837 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
———/-
कोट
होम क्वांरटाईन – 3378
एकूण तपासणी व्यक्ती- 509789
प्राप्त अहवाल- 509682
प्रलंबित अहवाल- 107
एकूण निगेटिव्ह – 469224
कोरोनाबाधितांची संख्या- 40, 459
रुग्णालयात दाखल – 442
आतापर्यंत बरे – 38,837
मृत – 1180
Leave a Reply