सोलापूर ग्रामीण | 92 पॉझिटिव्ह; तर दोन जणांचा मृत्यू…

MH13 news Network

आज गुरुवारी दि. 14 जानेवारी रोजी ग्रामीण भागातील 92 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 56 पुरुष तर 36 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 75 आहे. यामध्ये पुरुष 54 तर 21 महिलांचा समावेश होतो . आज 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 1449 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1357 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 38 हजार 866 इतकी झाली आहे. यामध्ये 24106 पुरुष तर 14760 महिला आहेत.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1144 जणांचा मृत्यू झाला आहे यात 821 पुरुष तर 323 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 462 आहे .यामध्ये 308 पुरुष तर 154 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 37 हजार 260 यामध्ये 22977 पुरुष तर 14283 महिलांचा समावेश होतो.

या भागातील दोन जणांचा मृत्यू…

बार्शी येथील सुभाष नगर भागातील 49 वर्षांच्या एका पुरुषास 7 जानेवारी रोजी पहाटे सी एन एस हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 12 जानेवारी रोजी पहाटे एक वाजता त्यांचे निधन झाले.

मयत झालेली दुसरी व्यक्ती पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव या परिसरातील पुरुष असून त्यांचे वय 76 वर्ष होते. त्यांना  1 जानेवारी रोजी सायंकाळी यशोधरा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 12 जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता त्यांचे निधन झाले. यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 2

बार्शी –नागरी 7 तर ग्रामीण 3

करमाळा –नागरी 1 ग्रामीण 5

माढा – नागरी 5 तर ग्रामीण 12

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 22

मंगळवेढा – नागरी 0 ग्रामीण 2

मोहोळ – नागरी 3 ग्रामीण 10

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 1

पंढरपूर – नागरी 3 ग्रामीण 7

सांगोला – नागरी 3 ग्रामीण 5

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 1

आजच्या नोंदी नुसार नागरी – 22 तर ग्रामीण भागात 70 असे एकूण 92 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.