Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

MH13 News Network

सोलापूर ग्रामीणमध्ये आज आणखीन 153 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
आज सोमवारी दि.22 मार्च रोजी ग्रामीण भागातील 153 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 92 पुरुष तर 61 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 96 आहे. यामध्ये पुरुष 65 तर 31महिलांचा समावेश होतो .आज 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 2182 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2029 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 42 हजार 835 इतकी झाली आहे. यामध्ये 26,631 पुरुष तर 16,204महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

o

दोघांचा मृत्यू
माढा तालुक्यातील निमगाव भागातील 75 वर्षांचे पुरुष, तर मोहोळ तालुक्यातील गुरव वस्ती भागातील 70 वर्षांचे पुरुष या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.त्यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1211 जणांचा मृत्यू झाला आहे यात 870 पुरुष तर 341 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1491 आहे .यामध्ये 886 पुरुष तर 605 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 40 हजार 133 यामध्ये 24,875 पुरुष तर 15,258 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 3

बार्शी –नागरी 37 तर ग्रामीण 13

करमाळा –नागरी 1 ग्रामीण 11

माढा – नागरी 0 तर ग्रामीण 23

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 23

मंगळवेढा – नागरी 5 ग्रामीण 5

मोहोळ – नागरी 0 ग्रामीण 12

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0

पंढरपूर – नागरी 5 ग्रामीण 7

सांगोला – नागरी 3 ग्रामीण 4

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 1

आजच्या नोंदी नुसार नागरी 51 तर ग्रामीण भागात 102 असे एकूण 153 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

राज्यात आज 30535 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 11314 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2214867 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 210120 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.32% झाले आहे.
#CoronaVirusUpdates

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *