सोलापूर | भीती नको काळजी घ्या ; कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीस पुन्हा कोरोनाची लागण ; उपचारादरम्यान मृत्यू …

MH13 News Network

एखाद्या व्यक्तीस कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर त्यावर उपचार घेतल्यानंतर तो कोरोनामुक्त होतो. त्यानंतरही त्याने काळजी घेणे महत्त्वाचे आहे तसेच आरोग्यविषयक सर्व दक्षता घेणे गरजेचे आहे .अन्यथा त्यास पुन्हा कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. कारण covid-19 व्हायरस हा चेंजेबल व्हायरस आहे.त्यामुळे भीती नको पण काळजी घ्या असे आवाहन सोलापूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर दुधभाते यांनी केले आहे. सोलापूर शहर जिल्हा परिसरात घडलेली ही पहिलीच घटना आहे.

सोलापूर शहरात आज सोमवारी दि.2 नोव्हेंबर रोजी कोरोनाचे नवे 20 रुग्ण आढळले असून यामध्ये 14 पुरुष तर 6 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 54 इतकी आहे.

आज सोमवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 879 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 859 निगेटीव्ह आहेत.
आज 2 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9632 असून एकूण मृतांची संख्या 537 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 420 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 8675 इतकी आहे.

बाधित रुग्ण या परिसरातील…
वारद फार्म जवळ पूना रोड , गणेश मेडिकल मागे अशोक चौक ,झोपडपट्टी नंबर 2 विजापूर नाका, जुनी लक्ष्मी चौक डोंगरे रोड, आदित्य नगर ,वर्धमान हाइट्स, सहयोग नगर जुळे सोलापूर,निर्मिती विहार विजापूर रोड, गजानन अपार्टमेंट आसरा,
कृष्णा वसाहत विडी घरकुल ,शिवगंगा नगर शेळगी, दक्षिण सदर बझार, जयकुमार नगर बाळे ,देशमुख पाटील वस्ती ,कविता नगर दाजी पेठ, भवानी पेठ, सैफुल विजापूर रोड ,लक्ष्मी नगर देगाव रोड. या परिसरातील बाधित रुग्ण आढळले आहेत.
पाटील नगर सैफुल विजापूर रोड परिसरातील 25 वर्षाच्या महिला महिला 24 ऑक्टोंबर पासून एका खाजगी डॉक्टरकडे उपचार घेत होत्या 29 ऑक्टोबर रोजी रोजी सकाळी सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारादरम्यान हीच ऑक्टोंबर रोजी रोजी सकाळी सात वाजता त्यांचे निधन झाले त्यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.

सोलापूर शहरातील कोरोनावर एकदा मात केलेल्या व्यक्तीस पुन्हा कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले असून अशा प्रकारे आढळून आलेली ही पहिलीच घटना आहे.
मयत झालेली दुसरी व्यक्ती न्यू पाच्छा पेठ परिसरातील 68 वर्षाचे पुरुष असून 26 सप्टेंबर रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता .त्यानंतर त्यांनी त्यावर रीतसर उपचार देखील पूर्ण केलेले होते. 30 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 19 मिनिटांनी मार्कंडेय हॉस्पिटल येथे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले .उपचारादरम्यान 1 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून 39 मिनिटांनी त्यांचे निधन झाले .त्यांचा दुबार covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.