Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

MH13 News Network

सोलापूर शहरात आज सोमवारी दि.28 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 59 रुग्ण आढळले असून यामध्ये 40 पुरुष तर 19 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 52 इतकी आहे.

आज सोमवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार शहर परिसरातील फक्त 288 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये  229 निगेटीव्ह आहेत.
आज 1जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8358 असून एकूण मृतांची संख्या 468 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 887 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 7003 इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *