सोलापूर शहरात आज गुरुवारी दि.15 ऑक्टोबर रोजी कोरोनाचे नवे 28 रुग्ण आढळले असून यामध्ये 14 पुरुष तर 14 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 32 इतकी आहे.
आज मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 312 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 284 निगेटीव्ह आहेत. आज एकही जणांचा कोरोनाने मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9166 असून एकूण मृतांची संख्या 511 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 730 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 7925 इतकी आहे.