Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

MH13NEWS Network

सोलापूर शहरात मंगळवारी दि. 5 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 14 रुग्ण आढळले असून यामध्ये 9 पुरुष तर 5 स्त्रियांचा समावेश आहे.

आज मंगळवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 579 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 565 निगेटीव्ह तर 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज 56 लोक बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली. तर आज 1 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह व्यक्ती…
समर्थ नगर, मिहीर अपार्टमेंट रेल्वे लाईन्स, विणकर सोसायटी गांधी नगर, सेंट जोसेफ शाळेजवळ रेल्वे लाईन्स, वसंत विहार, सिद्धेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, अश्विनी हॉस्पिटलजवळ, सुशील नगर, पाच्छा पेठ, बालाजी मंदिराजवळ कुमठा नाका, विष्णू मिल चाळ, बुधवार पेठ या परिसरातील नऊ पुरुष आणि पाच महिला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला आहे.


शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11,148 असून एकूण मृतांची संख्या 602 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 377 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 10169 इतकी आहे.

हे आहे महत्वाचे

सोलापूर महानगरपालिकेकडून कोरोना बाधितांची व शहरातील covid-19 हॉस्पिटलच्या माहितीसाठी संपर्क करण्याकरिता कोविड कंट्रोल रूम सोलापूर महानगरपालिका या विभागाकडील मोबाईल क्रमांक 9823291818,व फोन क्रमांक 0 217-2740341 या नंबर वर तसेच ccmsc२०२०@gmail.com या इमेल द्वारे संपर्क करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *