Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

MH13 NEWS Network

सोलापूर शहरात मंगळवारी दि. 26 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 18 रुग्ण आढळले असून यामध्ये 9 पुरुष तर 9 स्त्रियांचा समावेश आहे.

आज मंगळवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 1274 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 1256 निगेटीव्ह तर 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 4 आहे. आज 1 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह व्यक्ती…

वर्धमान नगर, स्वामी विवेकानंद नगर हत्तुरेवस्ती, राजस्व नगर, विजापूर नाका २ नं. झोपडपट्टी, दमाणी नगर, प्रेस्टिज आयकॉन जुळे सोलापूर, वसुंधरा अपार्टमेंट बुधवार पेठ, उत्‍तर सदरबझार, ईश्वरी अपार्टमेंट विजापूर रोड, गुजरवस्ती जवळ हनुमान मंदिरासमोर, वामन नगर जुळे सोलापूर, सिद्धेश्वर नगर आर.टी.ओ. कार्यालयाजवळ, साईनगर सिद्धेश्वर साखर कारखान्याजवळ, होटगी रोड, जोडभावी पेठ, सम्राट अशोक सोसायटी कुमठा नाका या परिसरातील 9 पुरुष आणि 9 महिला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला आहे.

या भागातील एकाचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील गांधीनगर दक्षिण सदरबाझार येथील 85 वर्षांची महिला. त्यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.

शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11,675 असून एकूण मृतांची संख्या 630 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 327 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 10718 इतकी आहे.

हे आहे महत्वाचे

सोलापूर महानगरपालिकेकडून कोरोना बाधितांची व शहरातील covid-19 हॉस्पिटलच्या माहितीसाठी संपर्क करण्याकरिता कोविड कंट्रोल रूम सोलापूर महानगरपालिका या विभागाकडील मोबाईल क्रमांक 9823291818,व फोन क्रमांक 0 217-2740341 या नंबर वर तसेच ccmsc२०२०@gmail.com या इमेल द्वारे संपर्क करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *