सोलापूर शहर | 21 पॉझिटिव्ह; तर दोन जणांचा मृत्यू

MH13 NEWS Network

सोलापूर शहरात सोमवारी दि. 18 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 21 रुग्ण आढळले असून यामध्ये 11 पुरुष तर 10 स्त्रियांचा समावेश आहे.

आज सोमवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 453 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 432 निगेटीव्ह तर 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 11 आहे. आज 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह व्यक्ती…

संतोष नगर जुळे सोलापूर, इंद्रधनु सोसायटी, रेल्वे लाईन्स, कस्तुरबा गांधी नगर मसीहा चौक, पद्मावती नगर बाळे, पद्मशाली सोसायटी, भवानी पेठ, सोनामाता शाळेजवळ, डांगे कॉलनी शेळगी, मोहिते नगर होटगी रोड, सिद्धेश्वर सोसायटी भवानी पेठ, जवाहर नगर, गांधी नगर, आदित्य नगर आर.टी.ओ. कार्यालयाजवळ, बालशिवयोगी नगर, सूनील नगर एम.आय.डी.सी. रोड, विणकर वसाहत, मनमित ब्लॉसम, ब्रह्मदेव नगर होटगी रोड या परिसरातील अकरा पुरुष आणि दहा महिला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला आहे.

या भागातील दोघांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील ब्रह्मदेव नगर होटगी रोड येथील 56 वर्षांचे पुरुष तर न्यू पाच्छा पेठ परिसरातील 85 वर्षांची महिला यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.

शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11,495 असून एकूण मृतांची संख्या 621 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 357 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 10517 इतकी आहे.


हे आहे महत्वाचे

सोलापूर महानगरपालिकेकडून कोरोना बाधितांची व शहरातील covid-19 हॉस्पिटलच्या माहितीसाठी संपर्क करण्याकरिता कोविड कंट्रोल रूम सोलापूर महानगरपालिका या विभागाकडील मोबाईल क्रमांक 9823291818,व फोन क्रमांक 0 217-2740341 या नंबर वर तसेच ccmsc२०२०@gmail.com या इमेल द्वारे संपर्क करावे.