सोलापूर शहर | 48 पॉझिटिव्ह; तर एक जणांचा मृत्यू

MH13 NEWS Network

सोलापूर शहरात शुक्रवारी दि. 8 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 48 रुग्ण आढळले असून यामध्ये 32 पुरुष तर 16 स्त्रियांचा समावेश आहे.

आज शुक्रवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 633 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 585 निगेटीव्ह तर 48 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज 8 लोक बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली. तर आज 1 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह व्यक्ती…
फुरडे रेसिडेन्सी आय.टी.आय कॉलेजमागे, वळसंगकर हॉस्पिटलमागे लिमयेवाडी, व्यंकटेश नगर, वृंदावन सोसायटी बुधवार पेठ, कर्णिक नगर, नवी पेठ, कुमठा नाका, टी.व्ही. सेंटरजवळ कुमठा नाका, अभिमानश्री कॉम्प्लेक्स, भारतरत्न इंदिरानगर, पश्चिम मंगळवार पेठ, वैष्णवी सिटी मजरेवाडी, चंडक बागेजवळ बुधवार पेठ, रामलिंग सोसायटी विजापूर रोड, श्रद्धा एम्पायर रेल्वे लाइन्स, मारुती मंदिराजवळ उत्तर कसबा, राघवेंद्रमठाजवळ मुरारजी पेठ, अत्तार नगर विजापूर रोड, शिवगंगा नगर जुळे सोलापूर, सिद्धेश्वर पेठ, स्वामी विवेकानंद नगर विजापूर रोड, उत्तर कसबा, माशाळवस्ती, महेश नगर सम्राट चौक, वैष्णवी नगर जुळे सोलापूर, वॉटर फ्रंट अपार्टमेंट विजापूर रोड, चीदंबर नगर जुळे सोलापूर, मोदीखाना, संगमेश्वर कॉलेजमागे, भूमकर नगर भवानी पेठ, माजी सैनिक नगर विजापूर रोड, विडी घरकुल, शेटे नगर दमाणी नगर, गीता नगर न्यू पाच्छा पेठ, सहस्त्रार्जुन नगर जुळे सोलापुर, मोहितेनगर होटगी रोड, पश्चिम मंगळवार पेठ या परिसरातील बत्तीस पुरुष आणि सोळा महिला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला आहे.

शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11,240 असून एकूण मृतांची संख्या 606 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 303 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 10331 इतकी आहे.

हे आहे महत्वाचे

सोलापूर महानगरपालिकेकडून कोरोना बाधितांची व शहरातील covid-19 हॉस्पिटलच्या माहितीसाठी संपर्क करण्याकरिता कोविड कंट्रोल रूम सोलापूर महानगरपालिका या विभागाकडील मोबाईल क्रमांक 9823291818,व फोन क्रमांक 0 217-2740341 या नंबर वर तसेच ccmsc२०२०@gmail.com या इमेल द्वारे संपर्क करावे.