सोलापूर सोशल फाउंडेशनच्यावतीने वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील देशमुख मळा आणि वडवळ (ता.मोहोळ) येथे स्नेहसंवाद कार्यक्रम आणि वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला आ. सुभाष देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी आ. देशमुख यांच्या हस्ते परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच शेतकर्यांना वृक्षाचे वाटप करत त्याचे संगोपन करण्याचे आवाहन आ. देशमुख यांनी केले. यावेळी 10 वी आणि 12 वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.
या कार्यक्रमाला शहाजी देशमुख, सतीश काळे, सागर लेंगरे, श्रीकांत शिवपूजे, मनोजकुमार मोरे, सुशील क्षीरसागर व ग्रामस्थ उपस्थित होते.