‘स्मार्ट सिटी’ कामाबाबत राष्ट्रवादीने केली पालकमंत्र्यांकडे ‘तक्रार’ ; वाचा सविस्तर

सोलापुरातील स्मार्ट सिटी चे कामकाज हे संथ गतीने चालत असून यामुळे व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आधीच डबघाईला आलेल्या व्यापाऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून येत्या सणासुदीच्या काळात खरेदीसाठी नागरिक बाहेर पडतील. तेव्हा स्मार्ट सिटीचे संथ गतीने चालणारे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आज शुक्रवारी ४ सप्टेंबर रोजी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस बसवराज कोळी यांनी पालकमंत्री यांच्याकडे केलीय. आज शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात होम मैदानवरील ‘वॉकिंग ट्रॅक’ वर समोरा-समोर जात असताना एकमेकाला धक्का लागण्याचा प्रकार होत आहे. याला कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने वॉकिंग ट्रॅक ची बांधणी केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला. होम मैदान परिसरातील वॉकिंग ट्रॅक हा रुंदीने कमी असल्याने एखाद्या महिलेस धक्का लागण्याची शक्यता आहे. त्यावरून वाद निर्माण होऊ शकतो असेही निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.