स्वामी दर्शनाने मनाला शांती लाभत असून अक्कलकोटला आल्यानंतर सर्वप्रथम स्वामी दर्शन घेण्याचा मानस असतो. आज अक्कलकोटी येवून श्री वटवृक्ष स्वामी महाराजांचे दर्शन घेतल्याने अंतकरण भरुन आले आहे. यामुळे स्वामी आपल्या पाठीशी असल्याचे वारंवार जाणवते.
यामुळे स्वामी दर्शन घेत असताना जी अनुभूती येते ती अनुभूती शब्दात व्यक्त होत नाही असे मनोगत एस.एस.सी. व एच.एस.सी. बोर्डाचे पुणे विभागाचे अध्यक्ष अनुराधा ओक यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर बोलत होते. याप्रसंगी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी ओक व सचिव सौ.शिंदे मॅडम यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी मंदीर समितीचे विश्वस्त महेश गोगी, गटशिक्षण अधिकारी अशोक भांजे, डॉ.मल्लीनाथ बोधले , श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपूल जाधव, स्वामीनाथ लोणारी इत्यादी उपस्थित होते.
Leave a Reply