सोलापूर, प्रतिनिधी
सोलापूर पुणे महामार्गाचे काम बांधा वापरा हस्तांतरीत करा या तत्वावर पुणे सोलापूर रोड डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कडून पूर्ण होऊन त्या वर टोळ वसुली चालू आहे. उद्योजकांकडून नियमित व नियतकालिक देखभाल च्या कामांना बगल देण्यात येत आहे. रस्त्या वरील खड्डे पंधरा दिवसात पूर्ण दुरुस्त करून घ्यावे व प्रलंबीत पुनरुत्थान डांबरीकरणचे काम १५ एप्रिल २०२१ पर्यंत पूर्ण करून घेण्यात यावे अन्यथा आम आदमी पार्टी संबंधित उद्योजक व अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करून सावळेश्वर येथील टोळ वसुली बंद पाडूअसा इशारा निवेदनातून दिला आहे.
आम आदमी पार्टी सोलापूरचे शहर अध्यक्ष अस्लम शेख व पदाधिकाऱ्यांनी, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संजय कदम यांना निवेदन दिले आहे. सोलापूर ते सावळेश्वर ते मोहोळ या सेकशन मध्ये बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी रास्ता खचलेला असून चालत्या वाहनाला हादरे बसत असल्या चे जाणवते. रास्ता रहदारीला असुरक्षित होत आहे. ते दूरस्थ करावे.
या वेळी आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष मो. अस्लम अहम्दबाशा शेख, रॉबर्ट गौडेर, नासिर मंगलगिरी, प्राजक्त चांदणे आदी उपस्थित होते.
Leave a Reply