नागपूर : नागपुर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने बदली केली. राज्य सरकारच्या जल जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंढे यांच्या जागेवर राधाकृष्णन बी. यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र राज्याचे सामन्य प्रशासन विभागाने पाठविले आहे. विशेष म्हणजे तुकाराम मुंढे यांना काल मंगळवारी कोरोनाची लागण झाली आहे.होम क्वारंटाईन असतानाच तुकाराम मुंढेंची तडकाफडकी बदली झाली
मुंढे सध्या गृह विलगीकरणात आहेत. ते गृहविलगीकरणात असतानाच राज्य सरकारने त्यांचे स्थानांतर केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मुंढे यांच्या जागी नियुक्ती करण्यात आलेले राधाकृष्णन बी यांना त्वरित कार्यभार स्वीकारण्याची सूचना स्थानांतर पत्रात करण्यात आली आहे.
Leave a Reply