सोलापूर,दि.१४ : व्यवसायासाठी गुंतवलेली रक्कम व नफा रक्कम न दिल्याप्रकरणी जहीर अहमद बशीर अहमद ( रा. न्यू मेलापल्ली, हैदराबाद, तेलंगणा ), मिझ आबिद बेग मिर्झ अहमद बेग ( आसिफ नगर , हैदराबाद ) यांच्याविरुध्द सदर बाझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अब्दुल राऊफ इमाम खान ( वय ५१, कसावा हाईटस्, नेरूळ नवी मुंबई, सध्या सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे.
अंड्याच्या फर्मसाठी फिर्यादी खान यांनी आरोपी जहीर अहमद , मिझ बेग यांच्याकडे करारपत्र करून तीस लाख रुपये व महिन्याला ९० हजार रुपये नफा मिळवून देण्यासाठी करारपत्र केले होते . पण आरोपींनी नफ्याचे ८ लाख आणि गुंतवणूक केलेले ३० लाख असे एकूण ३८ लाख रुपये न देता आपली फसवणूक केल्याची फिर्याद खान यांन दिली आहे. फौजदार चानकोटी अधिक तपास करत आहे.
Leave a Reply