अन् .. गॅस सिलेंडरने आत्महत्या केली ; असं बी असतंय … वाचा सविस्तर

गॅस सिलेंडर आणि ईंधन दरवाढ विरोधात सोलापूर शहर युवक काँग्रेसचा अनोख आंदोलन, सतत होणाऱ्या दरवाढीमुळे असह्य होऊन गॅस सिलेंडरने केली आत्महत्या

मोदी सरकार गॅस सिलेंडर आणि ईंधन दरात सतत वाढ करत असुन यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आले असुन गॅस सिलेंडरला जीव असला तर सतत होणाऱ्या दरवाढीमुळे असहय होऊन आत्महत्या केली असती म्हणुन सोलापुर शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले, सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत गॅस सिलेंडरची फाशी घेऊन आत्महत्या असे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करुण गॅस सिलेंडर आणि ईंधन दरवाढिचा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी बोलताना शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे म्हणाले की मोदी सरकार घरगुती वापरातील गॅस सिलेंडरच्या आणि ईंधन दरात सातत्याने वाढ करत आहे. “फेब्रुवारी महिन्यामध्ये तब्बल 3 वेळा गॅस सिलेंडर च्या किंमती मध्ये वाढ झाली ही अनुक्रमे 25, 50, 25 इतकी वाढवली गेली. मार्च महिन्यात पहिल्याच दिवशी 25 रुपये वाढ केली. सोलापुरातील गॅस सिलेंडरचा आजचा भाव 827 रुपये असुन स्वातंत्र्यानंतर च्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिन्यात इतकी वाढ केली. यामुळे सर्वसामान्य जनता, गृहिणी त्रस्त झाले आहेत त्यांचे जगणे असह्य झाले असुन बजेट बिघड़ले आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण न करणारे मोदी सरकार असुन गॅस सिलेंडर, ईंधन दरवाढ, महागाई यामुळे मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत आहे काय? असे वाटत आहे म्हणून आज रोजी सतत होणाऱ्या दरवाढीमुळे असह्य होऊन गॅस सिलेंडरने फाशी घेऊन आत्महत्या केली असे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.

यावेळी उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, मध्य विधानसभा अध्यक्ष योगेश मार्गम, युवराज जाधव, गोविंद कांबळे, तिरुपती परकीपंडला, गणेश सालुंखे, नागनाथ गायकवाड़, भारत जाधव, धनराज गायकवाड़, संजय गायकवाड़, सुभाष वाघमारे, शाहु सलगर, राजेन्द्र शिरकुल, सचिन कोळी, शिवराज कोरे, सुरेश पाटील, मोनेश घंटे यांच्यासह इतर पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.