Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

आज शुक्रवारी दि.16 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 125 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 68 पुरुष तर 57 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 248 आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 1402 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1277 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 28 हजार 702 इतकी झाली आहे. यामध्ये 17,725 पुरुष तर 10,977 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 803 जणांचा मृत्यू झाला आहे यात 570 पुरुष तर 233 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 3 हजार 970 आहे .यामध्ये 2 हजार 852 पुरुष तर 1118 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 23 हजार 929 यामध्ये 14,303 पुरुष तर 9626 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 0

बार्शी –नागरी 49 तर ग्रामीण 2

करमाळा –नागरी 0 ग्रामीण 1

माढा – नागरी 5 तर ग्रामीण 8

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 43

मंगळवेढा – नागरी 1, ग्रामीण 1

मोहोळ – नागरी 0 ग्रामीण  0

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0

पंढरपूर – नागरी 6 ग्रामीण 6

सांगोला – नागरी 0 ग्रामीण 1

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 2

आजच्या नोंदी नुसार नागरी – 61 तर ग्रामीण भागात 64 असे एकूण 125 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *