आज शहरात बरे झाले 108; तर नवे बाधित 34

सोलापूर शहरात आज बुधवारी दि.25 नोव्हेंबर रोजी कोरोनाचे नवे 34 रुग्ण आढळले असून यामध्ये 24 पुरुष तर 10 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 108 इतकी आहे.

आज मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 1423 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 1389 निगेटीव्ह आहेत.

आज एकही जणांचा कोरोनाने मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10,237 असून एकूण मृतांची संख्या 560 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 436 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 9241 इतकी आहे.