सोलापूर शहरातील आज रविवारी दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी 474 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 423 अहवाल निगेटिव्ह आले. मात्र ज्या 34 पुरुषांचा अहवाल कोरोनाबाधित आला .त्यातील दोन युवकांचा मृत्यूनंतरचा अहवाल बाधित असल्याची माहिती मिळाली आहे.
सोलापूरच्या महापालिका आरोग्य अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार आज चौघांचा मृत्यू झाला असून त्यापैकी तिघे पुरुष असून एका महिलेचा समावेश होतो. सिव्हिल हॉस्पिटल मधील तीन व्यक्ती तर यशोधरा रुग्णालयातील एक व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शहरातील विडी घरकुल परिसरातील संगमनगर भागातील एका 28 वर्षाच्या युवकाने दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी गळफास घेतला होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला. दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटाने त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचा covid-19 अहवाल मिळाला असून तो पॉझिटिव्ह आहे.
शेळगी परिसरातील मित्र नगर भागात राहत असलेल्या 27 वर्षाच्या युवकास 10 ऑक्टोंबर रोजी रात्री एक वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते .एक ऑक्टोंबर रोजी वाहतुकीमधील झालेल्या अपघातामध्ये त्याच्या चेहर्यावर, छातीवर व पोटावर गंभीर इजा झालेल्या होत्या. उपचारादरम्यान दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्याचे सीएनएस हॉस्पिटल येथे निधन झाले .त्याचाही covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.
दरम्यान, शास्त्रीनगर परिसरातील शानदार चौक येथील 58 वर्षाची महिला आणि पश्चिम मंगळवार पेठ परिसरातील 69 वर्षाचे पुरुष यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .या दोघांचेही covid-19 अहवाल प्राप्त असून ते पॉझिटिव्ह आहेत
Leave a Reply