तिर्हे जि.प. शाळेसमोरील अतिक्रमण काढण्याचे आदेश
जिल्हाधिकारी कार्यालयाने आ. सुभाष देशमुख यांनी तिर्हे (ता. उत्तर सोलापूर) येथील जि.प.शाळेसमोरील अतिक्रमण काढण्याच्या केलेल्या मागणीची दखल घेतली असून उत्तरच्या तहसीलदारांना त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
तिर्हे येथील जि.प. शाळेसमोरीलच व्यापार्यांनी अतिक्रमण करून गाळे बांधले आहेत. त्यामुळे मुलांना शाळेला जाण्यासाठी रस्ताच राहिलेला नाही. त्यामुळे येथील मुलांनी मध्यंतरी जि.प.च्या आवारातच शाळा भरवली होती. ही गंभिर परिस्थिती लक्षात घेत आ. सुभाष देशमुख यांनी तत्काळ जिल्हाधिकार्यांकडे शाळेसमोरील अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती. आ. देशमुखांच्या या मागणीचे दखल घेत प्र. ना. तहसीलदार (महसूल) संदिप लटके यांनी उत्तरच्या तहसीलदारांना पत्र देत येथील अतिक्रमण तातडीने काढण्याचे आदेश दिले आहेत.
Leave a Reply