Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

ठाणे,दि.24 : ठाण्याचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate (ED) च्या पथकाने छापा टाकला आहे. मनी लाँड्रिंगच्या संशयावरून प्रताप सरनाईक यांच्या घरी हे पथक पोहोचले आहे. प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे इतर नेतेही ईडीच्या रडारवर असल्याची शक्यता आहे.

टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई करण्यात आली आहे. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात ही शोधमोहीम सुरु आहे. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरनाईक यांच्याव्यतिरिक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

याशिवाय त्यांचे चिरंजीव पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे अधिकारी सकाळी आठ वाजता दाखल झाले आहेत.मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीला प्रताप सरनाईक यांच्यावर संशय आहे. त्यामुळे ठाण्यात 10 ठिकाणी ईडीच्या पथकाकडून पाहणी केली जात आहे.

सरनाईक हे ठाण्यातील ओव्हळा-माजीवाडा विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. ते मीरा-भाईंदर परिसराचे शिवसेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते आहेत. ईडीच्या कारवाईमुळे शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *