सोलापूर /
संपूर्ण सोलापूर शहर परिसराचे लक्ष वेधून घेतलेल्या ऑनलाइन मटका बुकी प्रकरणी नगरसेवक सुनील कामाठी सह इतरांना जामीन मंजूर झाल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे.
राजभुलक्ष्मी इमारत कोंचिकोरवे गल्ली सोलापूर या ठिकाणी पोलीस निरीक्षक संजय जगताप व त्याच्या सहकाऱ्यांनी दि-24 सप्टेंबर रोजी मटका बुकी वर छापा टाकला होता.
आरोपी सुनील कामाठी व त्यांची पत्नी ,इस्माईल मुच्छाले आणि रफिक तोनशाळ यांना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एम.एम. बवरे साहेब यांनी जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की,दि:-24 रोजी पोलिसांनी छापा टाकून तेथे काही इसमाना अटक केली होती तर मुख्य सूत्रधार म्हणून नगरसेवक सुनील कामाटी व काही आरोपींना सदर केसमध्ये भागीदार म्हणून अटक केली होती.
सदर गुन्ह्याच्या तपासात मटका व्यवसायातून 307 कोटींचा व्यवहार पोलिसांनी दाखविला होता.नगरसेवक सुनील कामाठी यास दि.23 रोजी पोलिसांनी हैद्राबाद येथून अटक केली होती.चौघांनी वकिलामार्फत जामीन मिळणे साठी अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस या गुन्ह्यातील भा. द.वि 420 कलम हे लागू होत नाही.तसेच आरोपी हा नगरसेवक आहे.तो कुठेही पळून जाणार नाही. असे मुद्दे मांडले ते ग्राह्य धरून मे.न्यायालयाने पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला,तर नगरसेवक सुनील कामाटी यांच्या पत्नी सुनीता कामाटी यांना दिलेला अंतरीम जामीन कायम केला.
याप्रकरणी आरोपीतर्फे ॲड.मिलिंद थोबडे,ॲड.विनोद सूर्यवंशी, ॲड. श्रीकांत पवार यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲड. जाधव यांनी काम पाहिले.
Leave a Reply