Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

आज शनिवारी दि.10 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 205 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 132 पुरुष तर 73 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 394 आहे. आज 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 2146 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1941 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 27 हजार 598 इतकी झाली आहे. यामध्ये 17,060 पुरुष तर 10,538 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 753 जणांचा मृत्यू झाला आहे यात 533 पुरुष तर 220 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 506 आहे .यामध्ये 3 हजार 356 पुरुष तर 1260 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 22 हजार 339 यामध्ये 13,279 पुरुष तर 9060 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 2

बार्शी –नागरी 13 तर ग्रामीण 23

करमाळा –नागरी 0 ग्रामीण 0

माढा – नागरी 3 तर ग्रामीण 16

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 52

मंगळवेढा – नागरी 0,ग्रामीण 4

मोहोळ – नागरी 0 ग्रामीण 16

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 1

पंढरपूर – नागरी 13 ग्रामीण 39

सांगोला – नागरी 1 ग्रामीण 21

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 1

आजच्या नोंदी नुसार नागरी -30 तर ग्रामीण भागात 175 असे एकूण 205 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *