कोरोना | शहरात नव्याने 217 ‘पॉझिटिव्ह’ ; कोरोनाने घेतला दोघांचा बळी

कोरोना संसर्गाची बाधा कमी होत आहे याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात असताना विशेष म्हणजे लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे. राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

सोलापूर शहरात आज गुरूवारी दि. 25 मार्च रोजी कोरोनाचे नवे 217 रुग्ण आढळले असून यामध्ये 121 पुरुष तर 96 स्त्रियांचा समावेश आहे.

आज गुरूवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 1062 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 845 निगेटीव्ह तर 217 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज 84 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बाधित व्यक्ती…