ग्रामीण | अठ्ठावीस पॉझिटिव्ह; तर एक जणांचा मृत्यू…

MH13 News Network

आज रविवारी दि. 24 जानेवारी रोजी ग्रामीण भागातील 28 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 17 पुरुष तर 11 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 45 आहे. यामध्ये पुरुष 28 तर 17 महिलांचा समावेश होतो . तर आज कोरोनामुळे 1 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 1791 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1763 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 39 हजार 289 इतकी झाली आहे. यामध्ये 24375 पुरुष तर 14914 महिला आहेत.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1154 जणांचा मृत्यू झाला आहे यात 831 पुरुष तर 323 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 380 आहे .यामध्ये 228 पुरुष तर 152 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 37 हजार 755 यामध्ये 23316 पुरुष तर 14439 महिलांचा समावेश होतो.

या भागातील एक जणांचा मृत्यू…

मयत झालेली व्यक्ती करमाळा तालुक्यातील कंदर या परिसरातील 82 वर्षांचे पुरुष असून त्यांना 11 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता अपेक्स हॉस्पिटल पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 21 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजून 15 मिनिट वाजता त्यांचे निधन झाले.

कोविड – 19 तालुका निहाय माहिती : – –

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 0

बार्शी –नागरी 7 तर ग्रामीण 3

करमाळा –नागरी 1 ग्रामीण 2

माढा – नागरी 0 तर ग्रामीण 1

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 2

मंगळवेढा – नागरी 0 ग्रामीण 0

मोहोळ – नागरी 1 ग्रामीण 2

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0

पंढरपूर – नागरी 1 ग्रामीण 4

सांगोला – नागरी 1 ग्रामीण 3

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0

आजच्या नोंदी नुसार नागरी – 11 तर ग्रामीण भागात 17 असे एकूण 28 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.