Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज गुरूवारी दि.24 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 503 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 318 पुरुष तर 185 महिलांचा समावेश होतो.

आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 355 आहे. आज 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यात 6 पुरुषांचा आणि 4 महिलांचा समावेश होतोय.

आज एकूण 3668 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2165 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 22 हजार 670 इतकी झाली आहे. यामध्ये 13,970 पुरुष तर 8664 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 628 जणांचा मृत्यू झाला आहे यात 437 पुरुष तर 191 महिलांचा समावेश होतोय.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 7 हजार 112 आहे .यामध्ये 4 हजार 612 पुरुष तर 2500 महिलांचा समावेश होतो.

आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 14 हजार 930 यामध्ये 8954 पुरुष तर 5976 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 7 तर ग्रामीण 4

बार्शी –नागरी 50 तर ग्रामीण 30

करमाळा –नागरी 22 ग्रामीण 43

माढा – नागरी 17 तर ग्रामीण 55

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 117

मंगळवेढा – नागरी 6 ,ग्रामीण 15

मोहोळ – नागरी 1 ग्रामीण 13

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 5

पंढरपूर – नागरी 18 ग्रामीण 59

सांगोला – नागरी 12 ग्रामीण 22

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 7

आजच्या नोंदी नुसार नागरी -133 तर ग्रामीण भागात 370 असे एकूण 503 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *