Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

सोलापूर ग्रामीणमध्ये आज आणखीन 107 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
आज शनिवारी दि.13 मार्च रोजी ग्रामीण भागातील 107 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 61 पुरुष तर 46 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 60 आहे. यामध्ये पुरुष 38 तर 22 महिलांचा समावेश होतो .आज 1 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 2283 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2176 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 41 हजार 486 इतकी झाली आहे. यामध्ये 25,814 पुरुष तर 15,672 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.
बार्शी येथील वैराग भागातील 74 वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1196 जणांचा मृत्यू झाला आहे यात 859 पुरुष तर 337 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 774 आहे .यामध्ये 480 पुरुष तर 294 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 39 हजार 516 यामध्ये 24,475 पुरुष तर 15,041 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 1 तर ग्रामीण 0

बार्शी –नागरी 7 तर ग्रामीण 1

करमाळा –नागरी 0 ग्रामीण 5

माढा – नागरी 1 तर ग्रामीण 18

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 28

मंगळवेढा – नागरी 1 ग्रामीण 7

मोहोळ – नागरी 2 ग्रामीण 5

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 1

पंढरपूर – नागरी 3 ग्रामीण 20

सांगोला – नागरी 5 ग्रामीण 2

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0

आजच्या नोंदी नुसार नागरी -20 तर ग्रामीण भागात 87असे एकूण 107कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *