ग्रामीण | सोलापुरात वाढले 41 नवे कोरोनाबाधित ; या भागात…

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात  आज मंगळवारी  नवे कोरोनाबाधित 41 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून  एकाच दिवशी 23 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 41 पैकी 21 पुरुष, 20 स्त्रियांचा समावेश आहे.  आज 0 तर  आतापर्यंत 1150  जणांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 39 हजार 143 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 466 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी  दिली.

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना  बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1852 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील  1811 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 41 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 1150  जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 37 हजार 527 जण बरे होऊन घरी गेली आहेत.

कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे

अक्कलकोट  –  1240

मंगळवेढा-  1789

बार्शी –      6773

माढा-         4156

माळशिरस – 7181

मोहोळ-       1900

उत्तर सोलापूर – 820

करमाळा-   2570

सांगोला      –   3103

पंढरपूर           8013

दक्षिण सोलापूर – 1598

एकूण –         39, 143

होम क्वांरटाईन – 5282

एकूण तपासणी व्यक्ती-  441696

प्राप्त अहवाल- 441301

प्रलंबित अहवाल- 395

एकूण निगेटिव्ह – 402159

कोरोनाबाधितांची संख्या- 39, 143

रुग्णालयात दाखल – 466

आतापर्यंत बरे – 37,527

मृत – 1150