चक्क रस्त्यावर मांडली चूल ; इंधन व गॅस दरवाढीचा केला निषेध

पेट्रोल- डिझेल तसेच  गॅस दरवाढीच्या विरोधात सोलापूर शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आयोजित आंदोलनात प्रतिकात्मक  चूल मांडून  मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

सोमवारी, डफरीन चौकातील सुपर पेट्रोल पंप येथे असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  अच्छे दिन आणण्याचे आश्वासन देणाऱ्या होर्डिंग पोस्टर समोर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका सुनीता रोटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. महिला  प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केलेल्या अहवालानुसार हे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी  केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत  सरकारच्या महागाईला सातत्याने चालना देणाऱ्या धोरणांचा निषेध केला.  शहराध्यक्षा रोटे यांनी मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे महागाई गगनाला भिडली असून त्यामध्ये आता गॅस दरवाढीची भर पडल्याने सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाल्याचे सांगून  ही दरवाढ मागे घेण्याची मागणी केली .

या आंदोलनात लता ढेरे, लता फुटाणे , सायरा शेख, शोभा गायकवाड अफरीन पटेल, मार्था आसादे, शशीकला कस्पटे, पूजा ताजने, उषा केसरे सिया मुलांनी राजश्री माशाळे अश्विनी भोसले जया नाकोड उषा भेसरे, महानंदा मुळे, रेणुका कंदगिरी, मनीषा गुरव, मीनाक्षी कांबळे, ज्योती सरवदे, अलका भालेराव, कविता कोडवान, संगीता कांबळे, नौशाद शेख, सुवर्णा ईश्वरकट्टी, यल्लुबाई साखरे, निर्मला दौलताबाद व पूजा पाजणे यांच्यासह अन्य महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या शासनाच्या कोरोनाविषयक सोशल डिस्टंसिंग नियमांचे  पालन करून सहभागी झाल्या होत्या.

मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल- डिझेल या इंधन  व गॅस दरवाढीच्या विरोधात शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे प्रतीकात्मक चूल मांडून आंदोलन करताना, कार्याध्यक्ष संतोष पवार, शहराध्यक्षा सुनीता रोटे यांच्यासह महिला आघाडीचे पदाधिकारी.