चित्राताई वाघ यांनी घेतले नूतन वर्षाच्या मुहूर्तावर समर्थांचे दर्शन

भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्राताई वाघ यांनी नूतन वर्षाच्या मुहूर्तावर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटूंब भेट देऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी बोलताना चित्राताई वाघ यांनी नूतन वर्षाच्या प्रारंभीच श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडल्याने जीवनात चैतन्यमय स्वामी कृपेचा सुगंध दरवळेल असे  मनोगत व्यक्त केले.

यावेळी आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, नगरसेवक महेश हिंडोळे, नागेश कुंभार, विक्रम (बाळा) शिंदे, प्रविण देशमुख, सुनिल गवंडी, अविनाश मडीखांबे, गिरीश पवार, विपूल जाधव इत्यादी उपस्थित होते. 

वटवृक्ष मंदीरात चित्राताई वाघ यांचा सत्कार करताना महेश इंगळे, आ.सचिन दादा कल्याणशेट्टी व अन्य दिसत आहेत.