चीनने भारतीय सैनिकांवर केलेल्या विश्वासघातकी हल्ल्यानंतर भारतात चिनी मालावर बहिष्काराचा नारा बुलंद झाला. भारत सरकारनेही चिनी ऍपवर बंदी घातली; परंतु त्याला समर्थ भारतीय पर्याय देणेही गरजेचे होते. भारतीय तरुणांनी यासाठी कंबर कसली आहे. त्यामध्ये प्राधिकरण-स्वप्ननगरी येथील तरुण अभियंता अभिजीत पवार याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्याने चिनी ऍप “शेअर इट’ आणि “झेंडर’ यांना पर्याय देण्यासाठी “फाईलशेअर’ हे ऍप बनविले आहे.
व्हिजेटीआय या नामवंत संस्थेत इंजिनिअरिंग करून पुढे जपानमध्ये त्याने नामवंत कंपनीत नोकरी केली. नंतर स्वतःच्या सॉफ्टवेअर सिस्टीम्स विकसित करायला सुरुवात केली. बालवर्गातील मुलांसाठी हसतखेळत शिक्षण देण्यासाठी “लिटलमास्टर’ हे नवीन ऍप बनवले. नुकतेच चिनी “शेअर इट’ किंवा “झेंडर’ या ऍपला पर्याय देण्यासाठी त्याने आपला जयपूरचा मित्र आश्रय योगी याच्याबरोबर “फाईलशेअर’ हे ऍप बनवले आहे. या ऍपद्वारे मोठ्या साईझच्या फाईल्स सहज ट्रान्सफर करता येतात. हे ऍप गुगल प्ले स्टोअरवरदेखील उपलब्ध आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.riseuptech.fileshare
पंतप्रधान मोदी यांचे “आत्मनिर्भर भारत’चे आवाहन स्वीकारून नवी पिढी चिनी आव्हानांना तोंड देण्यासाठी उभी राहत आहे. विशेष म्हणजे अभिजीतला पूर्वी चिनी कंपनीकडून बिझनेससाठी ऑफर देण्यात आली होती. परंतु चीनच्या भारताविषयीच्या वर्तणुकीचा निषेध म्हणून त्याने ती ऑफर नाकारली.
भारतामध्ये चिनी “टिकटॉक’ ऍपला बंदी घातल्यानंतर तेव्हापासूनच आम्ही चिनी “शेअर इट’ किंवा “झेंडर’ या ऍपला पर्याय होऊ शकतील असे “फाईलशेअर’ हे ऍप बनविण्यास सुरुवात केली. संबंधित ऍप बनविण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागला. या ऍपच्या माध्यमातून पैसा कमाविणे हा हेतू नसल्याने आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती ऍपवर दाखवत नाही. तसेच, यूजरची माहिती देखील आम्ही घेत नाही.
– Abhijeet Pawar, CEO, RiseUP Technologies Pvt Ltd.
Founder FileShare and LittleMaster
Leave a Reply