सोलापूर जिल्ह्यात प्रलंबित असणाऱ्या सुमारे 11700 फेरफार नोंदीचे निर्गतीकरण करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
कोरोना कालावधीत अनेक शेतकऱ्यांच्या फेरफार नोंदी घेण्याचे काम काहीसे मागे पडले होते. त्याचा 31 जानेवारी,2020 रोजी आढावा घेण्यात आल्या. त्यावेळी 12671 फेरफार नोंदी प्रलंबित होत्या. या नोंदी निकाली काढण्यासाठी एक फेब्रुवारीपासून विशेष अभियान हाती घेण्यात आले. तलाठी, मंडल अधिकारी, नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांच्या स्तरावर विशेष अभियान राबवून दहा दिवसांत सुमारे 11700 फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या.
त्यापैकी काही फेरफार दाखले आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. मोडनिंब येथे झालेल्या कार्यक्रमास आमदार बबनराव शिंदे, राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आदी उपस्थित होते. याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी सांगितले.
Leave a Reply