धुतर ससाणाचे सोलापुरात पहिल्यांदाच मिळाले फोटोग्राफी रेकॉर्ड

सोलापुरातील वन्य जीव मित्र व हौशी फोटोग्राफर
संतोष धाकपाडे हे नेहमीप्रमाणे बुधवारी सुट्टी असल्याने त्यांच्या मुलांबरोबर म्हणजेच सुरज आणि राकेश बरोबर हिरज परिसरात फेरफटका मारायला गेले असता त्यांना एक शिकारी पक्षी दिसून आला. संतोष यांना पहिल्यांदा तो पक्षी बहिरी ससाणा सारखा दिसून आला. त्यांनी व त्यांच्या मुलांनी त्या पक्ष्याचे फोटो काढून घेतले.

संतोष यांनी त्या पक्ष्याचे फोटो रत्नाकर हिरेमठ यांना पाठवून त्या पक्ष्याची ओळख करून घेतली. त्या पक्ष्याचे फोटो पाहून रत्नाकर याने हा अतिशय दुर्मिळ आणि कमी प्रमाणात दिसणारा धुतर ससाणा आहे असे सांगितले तसेच आज पर्यंत सोलापूर मध्ये या पक्ष्याचे फोटोग्राफी रेकॉर्ड कुणाकडे नव्हते. तो पक्षी म्हणजे धुतर ससाणा #Eurasian_Hobby असे इंग्रजी मध्ये त्या पक्ष्याचे नाव आहे. धुतर ससाणाचे सोलापुरात पहिल्यांदाच फोटोग्राफी रेकॉर्ड मिळालेले आहे असे त्यांनी सांगितले.

धुतर ससाणा हा एक शिकारी पक्षी आहे. याला मराठीमध्ये धूती शिक्रा, अंधारी बाज (स्त्री.), धूती शिखरा (पु.) असेही म्हणतात. इंग्रजीत याला Eurasian Hobby म्हणतात.


आकाराने कबुतरा एवढा. दिसायला बहिरी ससाण्यासारखा; पण आकाराने लहान शेपटीसहित वरील अंगावर पट्टे नसतात. अरुंद मिशा. मानेवरच्या बाजूला पांढरा चट्टा असतो. खालील भागावर रेषा असतात. पोटाखालचा भाग काळसर लाल असतो. उडताना लांब आणि रुंद पंखांचा व लहान शेपटीचा वाटतो

धुतर ससाणा हा हिवाळी पाहुणा आहे. पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश आणि भारतात दक्षिणेकडे बेळगावपर्यंत.

निवासस्थाने
माळराने आणि विरळ झाडे असलेला प्रदेश