सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.असे असताना त्याचा थेट परिणाम आणि आर्थिकदृष्ट्या फटकाही महाराष्ट्राला बसला आहे. असं असलं तरी राज्याचं अर्थचक्र सुरू करण्यासाठी आता लॉकडाउननंतर अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्यानं राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अशातच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होण्याची संकेत दिले आहे.
“राज्यात आता लॉकडाउनचा विषय राहिला नसून येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत महाराष्ट्र पूण अनलॉक होईल. कोरोनावर अद्याप लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला आता करोनासोबतच जगावं लागणार आहे,” असं टोपे म्हणाले. त्यांनी अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं. “येत्या नोव्हेंबरपर्यंत राज्यात सर्वकाही अनलॉक केलं जाईल. पुढील काही दिवसांत राज्यात टप्प्याटप्प्यानं शाळा, धार्मिक स्थळं, व्यायामशाळा उघडण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून टेली आय.सी.यू. प्रकल्प त्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्याच्या मदतीने कोरोनामुळे होणारा मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
राज्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्के यावर पोहोचले आहे ,हे मोठे दिलासादायक चित्र दिसून येतेय.
Leave a Reply