Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

सोलापूर, दि.3- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून ऑक्टोबर 2020 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी हेल्पलाइन नंबर जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेसंबंधी काही अडचण असल्यास विद्यार्थी, पालकांनी त्या क्रमांकावर संवाद साधून आपले शंकेचे निरसन करू शकतात, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.

अंतिम वर्ष, एटीकेटी आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा 5 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणार आहेत. त्यासाठी विद्यापीठाची परीक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. ऑनलाइन/ ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांना घरी बसून मोबाईल, लॅपटॉप, संगणकाद्वारे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्याची सोय करण्यात आली आहे. विद्यापीठाकडून त्यासाठी स्वतंत्र पोर्टल बनवण्यात आले आहे. www.pahsu.org या पोर्टलवरून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे.

विद्यार्थ्यांना काही अडचणी व समस्या असल्यास श्री गुंडू- 9623412484, श्री अलदार- 8275894911, श्री स्वामी- 8983930703, श्री देशमुख- 9767198594, श्री टिक्के- 8010093831, श्री पांढरे- 8010462681 या हेल्पलाइन क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शहा यांनी केले आहे.

प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या एटी-केटी परीक्षा नंतर
सध्या 5 ऑक्टोबर पासून अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. याबरोबरच पारंपारिक अभ्यासक्रमांच्या सत्र क्रमांक 3,4,5,6 आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सत्र क्रमांक 5,6,7,8 तसेच पाच वर्षे अभ्यासक्रमांच्या 7,8,9,10 या सत्रांच्या बॅकलॉगच्या देखील परीक्षा होणार आहेत. पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमांच्या सर्व परीक्षा 5 ऑक्‍टोबरपासून सुरू होतील. उर्वरित विद्यार्थ्यांच्या एटी-केटी परीक्षा 25 ऑक्टोंबर नंतर व नोव्हेंबर महिन्यात होतील. विद्यापीठाकडून संकेस्थळावर यासंबंधीचा वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला आहे. तरी यासंबंधी काही शंका असल्यास विद्यार्थ्यांनी हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *