- सोलापूर जिल्हा जैवविविधतेने नटलेला आहे. हिप्परगा तलाव, होटगी तलाव यासोबतच अनेक पाणवठ्याच्या ठिकाणी परदेशी पक्षांचे या ऋतूमध्ये आगमन होत असते. अनेक पक्षी घराच्या आजुबाजूस सुद्धा वावरताना दिसतात परंतु काही अपवाद वगळता अनेकांना ते पक्षी ओळखता येत नाहीत. तसेच निसर्ग सौंदर्याचा जर खरोखरच आनंद घ्यायचा असेल तर निसर्ग भटकंतीला पर्याय नाही. गेली सहा महिन्यांपासून कोव्हीड 19 च्या संक्रमनामुळे निसर्गभ्रमंतीसाठी घराबाहेर पडता आलेले नाही.
त्याच अनुषंगाने येत्या रविववारी 8 नोव्हे 2020 रोजी सोलापूर वनविभाग व वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन फाउंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने कुरनुर धरण, चपळगाव, ता.अक्कलकोट परिसरात पक्षी निरीक्षणाचा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या उपक्रमामध्ये विविध जातीचे पक्षी,त्यांचे रंग, आकार, पंखांची ठेवण, चोच इत्यादी निरिक्षणाद्वारे पक्षी कसा ओळखावा याची माहिती देण्यात येणार आहे. नैसर्गिक पक्षी निरीक्षणासोबतच खास ग्रामीण भागातील सुग्रास भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळविण्यासाठी निसर्गप्रेमींनी आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन फाउंडेशन, सोलापूरतर्फे करण्यात आले आहे.
▪️पक्षीनिरीक्षणानंतर सुग्रास भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
▪️ covid-19 च्या संक्रमणामुळे शासनाचे सर्व नियम व अटी पाळून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
▪️पक्षी निरीक्षणा वेळी भडक रंगाचे कपडे परिधान करू नये
▪️ पर्यावरण प्रेमींनी येताना आपल्यासोबत मास्क असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही.
संपर्क:- अजित_चौहान +919284778733
संतोषभाऊ धाकपाडे +919765439903
सचिन पाटील +919665870747
Leave a Reply