Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज मंगळवारी दि.6 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 138 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 86 पुरुष तर 52 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 258 आहे. आज 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 2063 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1925 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 26 हजार 674 इतकी झाली आहे. यामध्ये 16,470 पुरुष तर 10,204 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 730 जणांचा मृत्यू झाला आहे यात 517 पुरुष तर 213 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 5 हजार 006 आहे .यामध्ये 3 हजार 535 पुरुष तर 1471 महिलांचा समावेश होतो.

आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 20 हजार 938 यामध्ये 12,416 पुरुष तर 8522 महिलांचा समावेश होतो.
अक्कलकोट -नागरी 1 तर ग्रामीण 2
बार्शी –नागरी 18 तर ग्रामीण 10
करमाळा –नागरी 0 ग्रामीण 2
माढा – नागरी 1 तर ग्रामीण 7
माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 16
मंगळवेढा – नागरी 0 ,ग्रामीण 0
मोहोळ – नागरी 0 ग्रामीण 4
उत्तर सोलापूर – नागरी 12 ग्रामीण 30
पंढरपूर – नागरी 12 ग्रामीण 30
सांगोला – नागरी 2 ग्रामीण 28
दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 1
आजच्या नोंदी नुसार नागरी -34 तर ग्रामीण भागात 104 असे एकूण 138 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *